⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

विभाजन विभीषिका स्मृति दिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणी मुळे अनेक नागरिकांना रातोरात आपले घर सोडावे लागून त्याच्या वेदना कधीही विसरल्या जाऊ शकत नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगून १४ ऑगस्ट हा दिवस “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणुन पाळणे बाबत आव्हान केले होते.

त्यानिमित्त मुक्ताईनगर येथील एकनाथराव खडसे टलेंट स्कूल येथे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत फाळणीची महत्वपूर्ण माहिती देणारे व त्यांच्या वेदना दाखविणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रदर्शनात एकूण ५२ फलकाद्वारे फाळणीच्या घटनाक्रम बाबतची सविस्तर माहिती दाखवण्यात येऊन फाळणी मुळे सदर परिसरातील सर्व धर्मीय नागरीकांना काय वेदना झेलाव्या लागल्या याबाबत दाखविण्यात आले आहे. यावेळी सदर प्रदर्शनासाठी मुक्ताईनगर वासीय, विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.