⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राजमुद्रा फाऊंडेशनतर्फे ‘जागर स्त्री शक्तीचा-दांडिया उत्सव बक्षिसांचा’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या वतीने या वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त “जागर स्त्री शक्तीचा – दांडिया उत्सव बक्षिसांचा ” या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन ढेकू रोड परिसरात करण्यात आले असून कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची रविवार २ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे बक्षीस वितरणासाठी मुख्य उपस्थिती असणार आहे.

सदर कार्यक्रमात महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार असून त्यात स्कुटर , सोन्याची नथ , सोन्या-चांदीच्या राजमुद्रा , पैठणी साडी , गिफ्ट हॅम्पर असे अनेक बक्षिसांचा खजिना ठेवण्यात आला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराणी येसूबाई बचत गटाच्या महिला भगिनी व राजमुद्रा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण , तेजस पवार , दर्पण वाघ , विशाल पाटील , भूषण भदाणे , किशोर पाटील , उज्वल मोरे , मयूर पाटील , अक्षय पाटील , निनाद शिसोदे , गौरव पवार , अमोल पाटील , राहुल पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , कुणाल पाटील , खीलेश पवार , कुणाल चौधरी , तुषार वायकर हे प्रयत्न करत असून जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आव्हान राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्याम पाटील यांनी केले आहे.