⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

होळीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज.. गॅस सिलिंडर स्वस्तात खरेदीची संधी

जळगाव लाईव्ह न्यूज न्यूज । ६ मार्च २०२३ । आधीच महागाईमुळे होपळुन निघत आहे. त्यात सरकारने मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस दरवाढीचा मोठा झटका दिला आहोत. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरचा दर 1100 रुपयांवर गेला. मात्र या सगळ्यात तुम्हाला स्वस्तात गॅस सिलिंडर खरेदी करण्याची संधी आहे. येथे आम्ही तुम्हाला स्वस्तात गॅस सिलिंडर कसा बुक करू शकता ते सांगणार आहोत..

सिलिंडर कुठे बुक करायचा
तुम्ही अ‍ॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला त्यात कॅशबॅकचा पर्याय मिळेल. पेटीएमसह अनेक अ‍ॅप्सद्वारे तुम्हाला गॅस सिलिंडर बुकिंगवर कॅशबॅकची सुविधा मिळत आहे, परंतु आता तुम्हाला बजाज फायनान्स अ‍ॅपद्वारेही गॅस बुकिंगवर सूट मिळत आहे.

सवलत कशी मिळवायची
डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे ग्राहकांना गॅस बुकिंगवर 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की या ऑफरसाठी तुम्हाला कोणताही प्रोमो कोड वापरण्याची गरज नाही, परंतु तुम्ही बजाज पे UPI द्वारे पेमेंट करून सूट मिळवू शकता.

गॅस सिलेंडरची किंमत किती आहे?
मुंबईत गॅस सिलेंडर 1102.50 रुपयांना उपलब्ध आहे. तर जळगावमध्ये 1108 रुपयाला मिळत आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जळगावात सिलिंडरची किंमत 1059 रुपये होती. मात्र 1 मार्च पासून त्यात 50 रुपयाची वाढ झाली.