⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

चंद्रयान 1 व चंद्रयान 2 मोहिमांमधील सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्याची जळगावकरांना संधी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे शनिवार दि.28 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित जाहिर व्याख्यानासाठी बंगलोर येथील इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. आलोक श्रीवास्तव आणि सतिशचंद्र वाणी हे जळगावात येत असल्याची माहिती अध्यक्ष कृष्णकुमार वाणी व प्रा. नंदलाल गादिया यांनी दिली.

इस्त्रोद्वारे संचालित चांद्रयान-1, चांद्रयान-2, इनसॅट या सारख्या अनेक मोहीमांमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतलेल्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व समोरासमोर प्रत्यक्ष भेटण्याची संधी जळगावकरांना यानिमित्ताने मिळत आहे. खानदेशात प्रथमच अशा प्रकारचे सर्वांसाठी प्रवेश खुला असलेले व्याख्यान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्याख्यानानंतर अर्धा तास खगोलशास्त्रीय प्रश्नांसाठी राखीव असणार असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन रोटरी वेस्टतर्फे मानद सचिव अनुप असावा यांनी केले आहे.