जळगाव शहरबातम्या

रायसोनी महाविद्यालयात “पेटंट व बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा, अमोल पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील २०० संशोधक, स्कॉलर विध्यार्थानी व अभियंत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पाटील म्हणाले सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत नवनिर्मिती व संशोधनाचा स्पर्धात्मक लाभ घेण्यासाठी व्यावसायिक वाटचालीत ‘बौद्धिक संपदा महत्त्वाची भूमिका बजावते असे प्रतिपादन. मुंबईच्या इंडियन पेटंट ऑफिस येथील पेटंट परीक्षक अमोल पाटील यांनी केले.

भारत सरकारने १५ऑक्टोबर २०२० रोजी बौद्धिक संपदा साक्षरता आणि पेटंट जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाम प्रोग्राम फॉर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी साक्षरता आणि जागरुकता (कपिला) नावाची मोहीम सुरू केली आहे. या योजनेच्या उद्दिष्टांमध्ये बौद्धिक संपदा अधिकार (IPR) बाबत जागरुकता निर्माण करणे असल्याने, कपिला व एआयसीटीई तसेच जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या संयुक्त विध्यमाने आयोजित राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी त्यांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट या विषयावर सखोल माहिती देऊन सहभागी विध्यार्थ्यांना टीप्सही दिल्या. तसेच कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी नमूद केले की, ‘मानवाद्वारे साकारण्यात येणारे कोणत्याही स्वरूपाचे रचनात्मक कार्य म्हणजे बौद्धिक संपदा आहे. ही आपल्याला दैनंदिन जीवनात विविध स्वरूपात उपयोगास येत असते तसेच ती आधुनिकी काळाची गरज आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट याद्वारे आपण नवनिर्मिती व संशोधनास सुरक्षित करू शकतो. उद्योजक व व्यावसायिकांनी संशोधित तंत्रज्ञान, डिझाईन व उत्पादनाचे पेटंट केल्यास त्यास कायदेशीर पाठबळ मिळून भविष्यातील आर्थिक व मानसिक त्रास टाळता येऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. अमोल पाटील यांनी बौद्धिक संपदेचे सरंक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब असून, कॉपीराइटचा लाभ व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंत व्यक्तीच्या कुटुंबियांना रॉयल्टी मिळण्याची तरतूद भारतीय कायद्यात असल्याचे सांगितले. तसेच संस्थांच्या लोगोचा मालकी हक्क अबाधित राहण्यासाठी दर १० वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. या कार्यशाळेत ‘बौद्धिक संपदा अधिकारांचे उद्योग व्यवसायातील फायदे’ या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे समन्वयक आयआयसी तसेच रिसर्च ऑन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता हे होते. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button