⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

चोपडा महाविद्यालयात एकदिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातर्फे बी.सी.ए., बी.बी.ए., बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक व संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिवसीय “व्यक्तिमत्व विकास” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून गांधी संशोधन केंद्र, जळगाव येथील श्री. गिरीश कुलकर्णी व भगीरथ काउन्सेलींग सेंटर, जळगावचे संचालक पंकज व्यवहारे हे उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप सुरेश पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष आशाताई पाटील, सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचे आयोजन करण्याचा हेतू विषद केला तसेच भविष्यात कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होईल हे समजावून सांगितले. व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यांचा विकास कसा करावा यावर आपले मत मांडले.
या कार्यशाळेच्या संपूर्ण दिवसभरात वक्त्यांनी ६ सत्रात निरनिराळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात गिरीश कुलकर्णी यांनी “स्व-मुल्यांकन व स्वॉट विश्लेषण” (Self-assessment and SWOT analysis) या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘स्व-मूल्यांकन म्हणजे स्वताला स्वतःची ओळख होणे होय. या सत्रात वक्त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने स्व-मूल्यांकन कसे करावे? स्व-मूल्यांकनाचा व्यक्तीमत्व विकासात होणारा फायदा तसेच आपल्या आवडीनिवडी, छंद व सवयीचा व्यक्तीमत्वावर कशा प्रकारे प्रभाव पडतो? यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पंकज व्यवहारे यांनी “ध्येय निच्छितीकरण” (Goal Setting) या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी आयुष्यात कशा प्रकारे ध्येय निश्चित केले पाहिजेत व ध्येय निश्चित करत असतांना आपल्या क्षमतांचे आकलन आपल्याला असणे का गरजेचे आहे? यावर भाष्य केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात गिरीश कुलकर्णी “संभाषण कौशल्ये” (Communication Skill) या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वक्त्यांनी संभाषण कौशल्याचे आपल्या आयुष्यात किती अनन्य साधारण महत्व आहे हे सांगितले. संभाषणाचे प्रकार, संभाषणाची प्रक्रिया,संभाषणाचा उद्देश यावर देखील विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात पंकज व्यवहारे यांनी “देहबोली” (Body Language) या विषयावर सादरीकरण केले. या सत्रात व्यवहारे यांनी अतिशय रंजक पद्धतीने पॉवरपॉइंट सादरीकरण केले. आपली देहबोली आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव करते यावर सादरीकरण करतांना वक्त्यांनी अनेक दाखले दिलेत. ईतरांशी बोलतांना आपली देहबोली सकारात्मक कशी ठेवावी, कोणत्या हालचाली टाळायला हव्यात, समोरच्या व्यक्तीवर देहबोलीतून कशाप्रकारे प्रभाव पाडावा यावर देखील व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पाचव्या सत्रात पंकज व्यवहारे यांनी “Resume Writing” या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्रात वक्त्यांनी विद्यार्थ्यांना Resume Writing बद्दल विस्तृत मार्गदर्शन करतांना Resume, Curriculum Vitae व Bio data यातील फरक स्पष्ट केला. उत्तम Resume कसा असावा, Resume बनवताना घ्यावयाची काळजी व टाळावयाच्या बाबी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या सहाव्या सत्रात श्री. गिरीश कुलकर्णी यांनी “मुलाखतीची तंत्रे” यावर मार्गदर्शन केले. दिवसभरात कार्यशाळेत विविध सत्रांत चर्चिल्या गेलेल्या मुद्यांची सांगड घालत श्री. कुलकर्णी यांनी मुलाखतीची विविध तंत्रे विस्तृत स्वरुपात विषद केलीत. समारोप सत्रात श्री. कुलकर्णी यांनी २ विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरुपात सराव मुलाखत घेतली व सराव मुलाखतीत विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी टाळण्यासाठी मुलाखत तंत्रे कशी अमलात आणावीत? यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिवसभरात कार्यशाळेत आयोजित विविध सत्रांचा आढावा मांडला. विद्यार्थ्यांनी भविष्यात या सर्व तंत्रांचा उपयोग करून व्यक्तिमत्वाचा विकास घडवून व मुल्यांचा विकास करून स्वताची व समाजाची पर्यायाने देशाची प्रगती घडवून आणावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी.पाटील, उपप्राचार्य प्रा.एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन.सोनवने, श्री. वाय.एन.पाटील, डॉ.आर.आर.पाटील आदि उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी सहा.प्रा.ए.एच.साळुंखे यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. यावेळी सहा.प्रा.एल.बी.पटले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर व सहा.प्रा.आरती पाटील यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभाग, संगणक शास्त्र विभाग व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापक बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले.