⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्याला दीड लाखाचा गंडा, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखवून रोहन गजानन पाटील (१९, रा. कल्याणी नगर, निमखेडी) या विद्यार्थ्याला गुन्हेगाराने १ लाख ४८ हजार ५७३ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रोहन गजानन पाटील याला ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एका मोबाइल नंबरच्या टेलिग्राम ऍपवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने पार्टटाइम नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार जॉबची ऑर्डर पास करून देतो असे सांगून ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने फोन पे च्या माध्यमातून सात वेळा एकूण १ लाख ४८ हजार ५७३ रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले. ७ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सात वेळा ऑर्डर पास करायचे सांगून रोहनने वेळावेळी रक्कम ट्रान्सफर केली. इतकी रक्कम भरल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने हा प्रकार काका खुशाल पाटील, काकू संगीता पाटील व वडील गजानन पाटील यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सुरेंद्र नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय भालेराव करीत आहेत.

हे देखील वाचा :