गुन्हेजळगाव शहर

जळगावात एसटीच्या धडकेत ५४ वर्षीय महिला गंभीर जखमी, नातीलाही किरकोळ मार ; चालकावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात एसटी बसने धडक दिल्याने ५४ वर्षीय महिला आणि तिची तीन वर्षांची नात जखमी झाल्याची घटना गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. या अपघातात ललिता अर्जुन वराडे ((रा. गाडेगाव) यांच्या उजव्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, चिमुकली प्रियांशी वराडे हिला किरकोळ मार लागला आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ललिता वराडे आणि त्यांची तीन वर्षांची नात प्रियांशी वराडे या गुरुवारी सकाळी सुमारे ७.४५ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली परिसरातील भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावरून पायी जात होत्या. त्यावेळी एमएच १४, एनई ४२१७ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना धडक दिली. बसचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस हयगयीने व भरधाव वेगाने चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ललिता वराडे यांच्या उजव्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, प्रियांशी हिला किरकोळ मार लागला आहे.

एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ललिता वराडे यांचे पुत्र विजय अर्जुन वराडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एसटी बसचालक सुनील मोहनसिंग राजपूत (वय ५१, रा. जामनेरपुरा, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button