सोमवार, डिसेंबर 4, 2023

OLA ची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात घालणार धुमाकूळ, बुकिंग तारीख जाहीर; तुम्हाला ‘हे’ खास फीचर्स मिळतील

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । सध्या भारतीय बाजरात इलेक्ट्रिक स्कुटरला प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. यात OLA S1 Air ही स्कूटर बाजारात येऊ घातली असून देशातील अनेक लोक OLA एस1 एअरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्कूटर बाजारात धुमाकूळ घालेल असा एक्सपर्टचा दावा आहे. अशातच आता ओलाच्या या स्कुटरच्या बुकिंगची तारीख जाहीर झाली आहे. 28 जुलै 2023 रोजीपासून ही स्कूटर बाजारात दाखल होत आहे.

Ola इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सांगितले की Ola S1 Air ची खरेदी 28 जुलै ते 30 जुलै दरम्यान आरक्षित आणि विद्यमान समुदायासाठी 1,09,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सुरू होईल.

दरम्यान, 31 जुलै रोजीनंतर ई-स्कूटर खरेदी केल्यास, इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 1,19,999 रुपये एक्स-शोरूम किंमत चुकती करावी लागेल. ही स्कूटर ओला कम्युनिटीवर अगोदर बुक करता येईल. 28 जुलै पूर्वी स्कूटरची बुकिंग करता येईल. ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. त्यांना 1,09,999 रुपये एक्स-शोरूम किंमत मिळेल. याविषयीची माहिती ट्विटर हँडलवर कंपनीने दिली आहे.

काय आहेत फीचर
ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही स्कूटर 125 किमी गतीने धावण्याचा दावा करण्यात आला आहे. याची उच्चांकी गती 90 किमी/तास अशी आहे. यामध्ये एक हब मोटर आहे. त्याला ओला हायपरड्राइव मोटर असे म्हणतात. हे इलेक्ट्रिक स्कूटर 11.3 HP ची पॉवर आणि 58 NM का पीक टॉर्क देण्यास ही स्कूटर सक्षम आहे. S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी 4.5 ते 6.5 तासात 0-100% पर्यंत टॉप अप व्हेरियंटवर अवलंबून असते. 

या सुविधा पण
ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एक एलईडी हँडलँप, 7.0 इंच TFT स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिविटी, रिव्हर्स मोड, OTA अपडेट, रिमोट बूट लॉक/अनलॉक आणि म्युझिक प्लॅबॅकची सुविधा पण त्यात आहे.