नूतन मराठाप्रकरणी अण्णा गट गुन्हा दाखल करणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात बसून ७ जण एका रजिस्टरमध्ये २०१७ पासून आजपावेतोच्या सह्या करीत होते. स्व.नरेंद्र अण्णा पाटील गटाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी धडक देत ते रजिस्टर ताब्यात घेतले होते. 

दरम्यान, नूतन मराठामध्ये बोगस भरती प्रकरण घडवून आणत संस्थेची आणि शासनाची फसवणूक केली जाणार असल्याचा आरोप ऍड.विजय पाटील यांनी केला होता. मंगळवारी अण्णा गटाकडून याबाबत जिल्हापेठ पोलिसात अण्णा गटाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मविप्रच्या नूतन मराठा महाविद्यालयात सोमवारी सायंकाळी ५ महिला व २ पुरुषांना घेऊन उपप्राचार्य ए.बी.वाघ हे दस्तऐवज घेऊन जुन्या हजेरीच्या नावाखाली रजिस्टरमध्ये सह्या करीत होते. प्रकाराबाबत ऍड.विजय पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत दप्तर ताब्यात घेतले होते. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची महिती जळगाव लाईव्हला प्राप्त झाली आहे.