राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया जिल्हाध्यक्षांना पदावरून हटविले
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना पदावरून हटविण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांनी त्यांना कार्यमुक्तीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील हे होते. मुक्ताईनगर येथे दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियात पोस्ट टाकण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली होती. त्या वादानंतर खडसे आणि आ.चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद विकोपाला जाऊन राज्यात महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन झाली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांनी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे. तसे पत्र काही दिवसांपूर्वीच त्यांना देण्यात आले आहे. मुक्ताईनगर वाद आणि पक्षश्रेष्ठींकडून होणाऱ्या विचारनेतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिवराज पाटील हे खडसे गटाचे खंदे समर्थक असल्याने हा बदल खडसे गटाला देखील धक्काच आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई