गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन

जानेवारी 15, 2025 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । नॅशनल स्टार्टअप डे निमित्ताने गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत उद्यमिता संमेलनाचे आज दि १६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सरकारने सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाची घोषणा केली, हा दिवस गेल्या दशकभरात भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधोरेखित करतो.राष्ट्रीय स्टार्टअप डे च्या निमित्ताने स्वावलंबी भारत अभियान व गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ जाने रोजी सकाळी १० ते १ दरम्यान उद्यमिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

bharat abhiyan

यात जळगाव जिल्ह्यातील तरुणाईला स्टार्टअप किंवा स्वत:चा उद्योग/व्यवसाय सुरु करण्यासंदर्भांत मार्गदर्शन करण्यात येईल.या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील हया अध्यक्षस्थानी असतील. तसेच कार्यक्रमासाठी मा.खासदार स्मिताताई वाघ, मा.आ राजूमामा भोळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रमुख वक्ते योगेश उदगिरे (संचालक, ट्रिनेट्रिनी क्वाँटम प्रा.लि.)प्रा.डॉ.विकास गिते (संचालक, केसीआयआयएल इन्क्यूबेशन सेंटर) प्रशांत पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र जळगाव) तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.विजय पाटील (प्राचार्य, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) प्रा.डॉ.प्रशांत वारके (संचालक, गोदावरी आयएमआर जळगाव) यांची उपस्थिती असणार आहे.तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांसाठी सुवर्णसंधी असणार आहे.

या संमेलनात तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्या अनुभवांच्या आधारे व्यवसाय आरंभ करण्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर मार्गदर्शन करतील. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तरुणांना उद्योजकतेच्या नवीन वाटा शोधण्यासाठी प्रेरणा मिळेल.जळगावच्या तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now