⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | Jalgaon Politics : आता राष्ट्रवादीही दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करणार ; यांच्या नावावर खल सुरू

Jalgaon Politics : आता राष्ट्रवादीही दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करणार ; यांच्या नावावर खल सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने (BJP) दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले होते. त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाकडूनही जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांची भेट घेत एक जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नियुक्ती करावेत अशी मागणी केली. रावेर लोकसभा मतदार संघात लेवा समाजाचे प्राबल्य आहे तर जळगाव लोकसभा मतदार संघात मराठा मतदार जास्त आहेत. रावेर लोकसभा मतदार संघासाठी माजी आमदार मनीष जैन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे तर जळगाव लोकसभा मतदारसंघात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, प्रमोद पाटील, डॉ. पी. एस. पाटील यांच्या नावावर खल सुरू आहे.

जळगाव महानगराध्यक्षपदासाठी अभिषेक पाटील व विनोद देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. लवकरच नेत्यांकडून नाव जाहीर होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.