नबाब मालिकांचा भाजप नेत्यांवर आरोप, आ.महाजन म्हणतात….

नोव्हेंबर 1, 2021 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । ड्रग्जप्रकरणावरून राष्‍ट्रवादीचे नेते नबाब मलिक भाजप नेत्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप करीत आहेत. मलिक यांच्या या आरोपाला आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. नबाब मलिक करीत असलेले बेछूट व बिनबुडाचे आरोप पाहता त्यांची सध्या मनस्थिती ठीक नाही असे वाटत आहे, अशी टीका आ.महाजन यांनी केली आहे.

girish mahajan navab malik

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जळगावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वतः ट्रॅक्टर चालवीत गिरीश महाजन यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदविला. या मोर्चादरम्‍यान महाजन यांनी मिडीयाशी संवाद साधताना मलिक यांच्‍यावर निशाणा साधला.

राज्यात एवढे प्रश्न असतांना त्याकडे लक्ष न देता मलिक हे बेछूट आरोप करीत आहेत. त्यांना सध्या लवंगी फटाके फोडू द्या, येत्या काळात त्यांना कळेल देवेंद्र फडणवीस कोणता बॉम्ब फोडणार आहेत. ते तेव्हा कळेल ते कुठे आहेत आणि काय बरळत आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्‍यावर निशाणा साधताना महाजन म्‍हणाले, की गुलाबराव पाटील यांनी देखील सांगावे की त्‍यांनी कोणत्या शेतकऱ्यांना मदत केली. मदत न करता भाजपवर त्यांनी टीका करू नये; असंही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now