जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा केलाय. या दाव्याची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी खिल्ली उडवली आहे.
‘चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केलीय.
‘बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवानं सरकार पडलंच तर बहुमताच्या जोरावर पुन्हा हेच सरकार येणार. सरकार पाडण्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोवर हे सरकार पडणार नाही’, असा दावाही खडसेंनी केलाय.
वाईन विक्रीच्या सरकारच्या धोरणाबाबत विचारलं असता खडसे म्हणाले की, वाईनबाबत एकजण विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहेत. वाईन ही दारू आहे त्यामुळे आण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. मध्यप्रदेशात मॉलमध्ये बियर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशात भाजपला निवडून दिलं. तर दारूही गरिबांच्या हिताची असल्यानं पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ, असं वक्तव्य तेथील प्रदेश अध्यक्षांनी केलं आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवाल खडसे यांनी केलाय.
हे देखील वाचा :
- महावितरणचा अजब प्रकार : हातगाडी मजुराला ८४ हजार रुपयांचे बिल
- धकाकदायक : जुन्या वादातून तरुणासह पत्नी व आईला मारहाण
- घराला भीषण आग : होरपळून वृद्ध महिलेसह 4 जनावरांचा मृत्यू
- जळगाव रेल्वे स्टेशन जवळ ‘द बर्निंग कंटनेर’, इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक
- IRCTC Tourism : स्वस्तात फिरून या काश्मीर, आयआरसीटीसीने आणले जबरदस्त टूर पॅकेजेस, ‘एवढा’ येईल खर्च
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज