…आज मी त्यांना शुभेच्छा देतो…! वाढदिवसादिनी खडसे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

सप्टेंबर 2, 2021 10:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवशी पुन्हा एकदा विरोधकांना लक्ष्य केले आहे. ‘नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात निर्माण करण्याचे काम चालले आहे. हे काम माझे हितचिंतकच करत आहेत, त्यांना आज मी शुभेच्छा देतो. मात्र, मी कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही’, अशा शब्दांत खडसे यांनी हल्लाबोल केला. मुक्ताईनगर येथिल फार्महाऊसवर एकनाथ खडसे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

eknath khadse

यावेळी खडसे पुढे म्हणाले की, मुक्ताईनगर मतदारसंघात मी गेल्या ४० वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. हे करत असताना केवळ मुक्ताईनगर नव्हे, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज मी कोणत्याही पदावर नसलो तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अलीकडे मी पाहतो आहे. ईडी चौकशी असेल किंवा अन्य प्रकारे माझी जी छळवणूक चाललेली आहे, मला त्रास देण्याचे काम चालू आहे. ते चुकीचे आहे.

माझ्या राजकीय जीवनामध्ये ४० वर्षांत माझ्यावर एकही आक्षेप माझ्यावर नव्हता. असे असताना आता अशा प्रकारे अचानक वादळ उठणे, मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणे, नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात उभी करण्याचे काम चालले आहे.

हे काम माझे हितचिंतकच करत आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे. कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही चूक केलेली नाही. या सर्व प्रकरणातून मी जनतेच्या आशीर्वादामुळे निश्चितच बाहेर पडेन’, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now