वलठाण आश्रमशाळेतील उपशिक्षिका अलका सरदार यांना ‘नेशल बिल्डर अवार्ड’ जाहीर!

सप्टेंबर 26, 2022 5:38 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ज्येष्ठ उपशिक्षिका अलका वामन सरदार यांना रोटरी क्लब आॕफ मिल्क सिटीचा यंदाचा नेशल बिल्डर अवार्ड जाहीर झाला आहे. एका विशेष सोहळ्यात खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे.

jalgaon 96 1

सरदार यांनी कोरोना काळात थेट नंदुरबार जिल्ह्यात जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके पोहचविण्यासाठी पायपीट केली. याच काळात वाडी – वस्त्यांवर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यापनही केले. अध्यापनात आदिवासी बोली भाषेचा वापरही त्या करतात. त्यांच्या याच शैक्षणिक प्रयोगांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now