कन्नड घाटात एसटी बसचा थरारक अपघात; कठड्याला बस अडकल्याने ५९ प्रवाशांचा जीव वाचला

ऑगस्ट 23, 2026 3:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात थरारक अपघात झाला. स्टिअरिंग यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटून बस थेट दरीच्या दिशेने असणाऱ्या रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून बस कठड्याला अडकून थांबली आणि एक मोठा अनर्थ टळला.

kannadghat

घटनेच्या वेळी बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. अचानक बसचा ताबा सुटल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बस कठड्याला अडकल्यानंतर काही प्रवाशांनी घाबरून खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही वेळात सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढण्यात आले.

या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बसचे स्टिअरिंग रॉड तुटले होते की स्टिअरिंग यंत्रणा जाम झाली होती, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अपघाताच्या कारणाचा अधिकृत तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

कन्नड घाटातील धोकादायक वळणावर बस कठड्याला अडकल्याने ती दरीत कोसळण्यापासून बचावली. त्यामुळे ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now