जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून विविध राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची नावे आयुक्तांकडे सादर केली आहेत. येत्या ३० मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेत या सदस्यांची अधिकृत घोषणा होणार असल्याने महापालिकेच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.

महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे आज बुधवारी (दि.२५) भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी सुपूर्द करण्यात आली.

भाजपकडून यांच्या नावाचा प्रस्ताव?
भाजपच्या वतीने डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे यांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत.
ठाकरे गटाकडून यांच्या नावाचा प्रस्ताव?
दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित साळुंखे यांचे नाव सुचविले असून, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शरद तायडे यांचा प्रस्ताव मांडला आहे.
प्राप्त प्रस्तावांची छाननी येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी आयुक्तांच्या दालनात करण्यात येणार आहे. या छाननी प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची यादी निश्चित होऊन अंतिम निर्णयासाठी विशेष सभेसमोर ठेवण्यात येणार असून त्यामुळे ३० मार्च रोजी होणाऱ्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










