जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । चाळीसगाव शहरासह तालुक्यात अचानक दोन वेळा मोठ्या आवाजाने हादरलं. जमिनीतून स्फोटासारखा गढ़ आवाज झाल्याने नागरीक भयभीत होवून घराबाहेर आले. या आवाजांचे गूढ शोधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी यांनी शोध घेतला पण त्यांनाही आवाजाचे कारण समजून आले नाही.

अनेकांनी हा भूकंप असल्याचा अंदाज लावून प्रशासनाला माहिती दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची कोणताही नोंद नसल्याचे स्पष्ट केलं आहे. चाळीसगाव शहरासह पाटणादेवी, वलठाण, पिंपरखेड आदी भागात गुढ आवाजाची तीव्रता जास्त होती. असे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे घबराट उडालेल्या नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचं सांगितले. तर काहींनी तो आकाशात घडलेल्या घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला.
मात्र जमिनीतून झालेल्या आवाजाचे रहस्य काही समोर आले नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवले असून महसूल यंत्रणा आवाज कशामुळे आला याचा शोध घेत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.