गोलाणीत स्वच्छता राखा, अन्यथा..; महापालिकेचा व्यापाऱ्यांना इशारा

मे 30, 2026 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अस्वच्छता करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. स्वच्छता न राखणाऱ्या दुकानदारांना दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करत महापालिकेने शुक्रवारी व्यापाऱ्यांची शिष्टमंडळासोबत बैठक घेतली.

New Project 4 1

गोलाणी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त युरेश सुप्रिया यांची भेट घेऊन विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यामध्ये संकुलातील स्वच्छता, बंद पडलेल्या कचरा कुंड्या तसेच इतर नागरी सुविधांचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला.

बैठकीत महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना स्वच्छता राखण्याची जबाबदारी लक्षात आणून दिली. दुकानदारांनी दुकानासमोर कचरा टाकू नये, तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, व्यापाऱ्यांनी संकुलातील बंद अवस्थेतील कचरा कुंड्यांचा प्रश्न उपस्थित केला. ग्राहकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या अनेक कचरा कुंड्या सध्या बंद लिफ्टजवळ ठेवण्यात आल्याने त्यांचा वापर होत नसल्याची तक्रार करण्यात आली. यावर महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेला त्या कचरा कुंड्या कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.

महापालिकेच्या या भूमिकेमुळे गोलाणी व्यापारी संकुलातील स्वच्छता व्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, व्यापाऱ्यांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची तयारी दर्शविली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now