---Advertisement---
सरकारी योजना बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना; अर्ज कुठे करणार, कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२४ । महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेवरून विरोधकांनी तरूणांसाठी काहीच का केलं नाही? असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरूवात केली होती. मात्र अशातच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असे या योजनेचं नाव असून या योजनेसाठी उमेदवारांच्या वयाची अट काय आहे? त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे लागणार आहेत? जाणून घ्या.

Chief Minister Ladka Bhau Yojana jpg webp

लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकाराने उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे. जर तुम्ही त्यामध्ये बसत नसाल तर महायुती सरकारच्या लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घ्या.

---Advertisement---

या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्ण- रु.६ हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्ण- रु.८ हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण – रु.१० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे.

ही कागदपत्रे लागणार?
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्मदाखला किंवा वयाचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत.
उमेदवार हा महाराष्ट्र महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
उमेदवाराचे आधार नोंदणी असावी
उमेदवाराचे बँक खाते आधार सांलग्न असावे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---