muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जिल्ह्यातील प्रस्तावित ‘मुक्ताई-भवानी अभयारण्य’ करीता मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा व वायला या दोन गावांचे पुनर्वसनबाबत ग्रामस्थांशी चर्चा करणे,मत मतांतरे,समस्या जाणुन घेणेसाठी नुकतीच डोलारखेडा येथे ग्रामसभा पार पडली. अध्यक्षस्थानी सरपंच मीनाबाई कोळी तसेच प्रसंगी उपस्थिती वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, ग्रामसेवक सुनिल नवले,वनपाल दिगंबर पाचपांडे,वनरक्षक बापु थोरात हे होते.
व्याघ्र संवर्धन काळाची गरज असतांना,सदर वनक्षेत्रात पट्टेदार वाघांचा अधिवास कायम असुन यामुळे येथील वनक्षेत्रास ‘मुक्ताई-भवानी अभयारण्य’ घोषित करण्यात आले असुन अभयारण्यास अडसर ठरणाऱ्या डोलारखेडा व वायला या दोन गावांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे.दरम्यान वनविभागाच्या वरीष्ठ कार्यालयाने स्थानिक पातळीवरुन संबंधित शेतकरी यांचे सातबारे व गावठाण परीसरातील नमुना आठ अ उतारे मागवले असुन ग्रामस्थांशी सुसंवाद साधुन समस्या,अडी-अडचणी,तसेच याबाबतीत चर्चा करुन मत मतांतरे जाणुन घेणेसाठी ग्रामसभा घेण्यात आली. वनक्षेत्रपाल यांनी गावकरी यांना ‘आपण मोबदला घेऊन राजीखुशीने गाव व शेतजमीन सोडण्यास तयार आहे का? या प्रशनावर गावकरी यांचा उत्तम प्रतिसाद ग्रामसभेत मिळाला असल्याचे दिसून आले. याबाबतीत आम्हाला ‘योग्य मोबदला’ मिळाल्यास आम्ही आमचे घर-दारासह शेतजमीन सोडण्यास तयार आहोत हे सिद्ध झाले.वनविभागाच्या अधिकारी यांचेसोबत आणखीही बैठका होतील,हि बैठक पुनर्वसनाबाबत पहिलीच बैठक होती.व्याघ्र अधिवासास पोषक वातावरण निर्माण व्हावे तसेच व्याघ्र संवर्धनाकरीता योग्य तो मोबदला घेऊन मौजे डोलारखेडा येथील ग्रामस्थ घरादारासह शेतजमीन सोडुन दुसरीकडे स्थलांतर होण्यास तयार असल्याचे त्यांच्या उत्साहावरुन दिसुन आले.
या प्रसंगी जी बी गोसावी,दिपाली बेलदार,उपसरपंच अनिल कोळी,ग्राम पं स नंदु नमायते,राजु भोई,वन समिती अध्यक्ष विनोद थाटे,वनमजुर अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे,संजय कोळी,योगेश कोळी, वाहनचालक सुरेश कोळी,ग्रामस्थ महेंद्र गरुड,पो पाटील यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.