⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मनसेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । मनसे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा निरीक्षक विनय भोईटे ४ व ५ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

यांची झाली नियुक्ती 

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हा अध्यक्षपदी राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, तालुका सचिव अतुल जावरे, भुसावळ विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुका अध्यक्ष धीरज वाघमारे, तालुका सचिव विलास कोळी, जामनेर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी, तालुका अध्यक्ष अशोक पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्षपदी कल्पेश खैरनार, यावल तालुका अध्यक्षपदी जुगल पाटील, यावल शहर अध्यक्षपदी आकाश चोपडे, रावेर तालुका अध्यक्षपदी डॉ. मनीष फेगडे, अमळनेर विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील, तालुका सचिवपदी अरूण गव्हाणे, शहर अध्यक्षपदी धनू साळुंखे, शहर सचिवपदी आकाश महाले, धरणगाव तालुका अध्यक्षपदी राजू कोळी, तालुका सचिवपदी हेमंत महाजन, जळगाव तालुका अध्यक्षपदी हेमंत कोळी, तालुका सचिव भरत पाटील, गट अध्यक्षपदी उमेश धनगर, शैलेश चौधरी, नशिराबाद शहर अध्यक्षपदी जितेंद्र बऱ्हाटे, शहर सचिव अमोल माळी, चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी संग्राम शिंदे, शहर अध्यक्षपदी अण्णा विसपुते, भडगाव तालुका ध्यक्षपदी आबा पाटील, शहराध्यक्ष म्हणून सुनील सूर्यवंशी, पाचोरा तालुकाध्यक्षपदी शुभम पाटील, शहर अध्यक्षपदी ऋषिकेश भोई, एरंडोल तालुकाध्यक्षपदी विशाल सोनार, शहराध्यक्षपदी संदेश पाटील, पारोळा तालुकाध्यक्षपदी वसंत पवार यांची नियुक्ती केली.