⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

पाचोऱ्यात अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात आमदारांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । पाचोऱ्यात काल शुक्रवारी सायंकाळी सलग तीन तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील काही भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन नागरीकांच्या घरात, दुकानात मोठया प्रमाणात पाणी शिरले. याची पाहणी आज शनिवारी आमदार किशोर पाटील यांनी केली. दरम्यान, या भागातील गटारी व नाल्यांचा प्रलंबित विषय मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिले.

शहरातील भिमनगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर व वाल्मिकी कॉलनी या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. आमदार पाटील यांच्यासह मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उद्योजक मुकूंद बिल्दीकर, कंत्राटदार मनोज, शांताराम पाटील, प्रविण ब्राम्हणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सुर्यवंशी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी, आरोग्य् विभागाचे मुकादम कर्मचारी यांनी सकाळी भेट देऊन या प्रभावीत भागाची केली व नगरपालिकेकडून या भागातील पाणी पाहून जाण्यासाठी नाले, गटारी त्वरीत बांधण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी सुचीत केले असता. त्वरीत या भागातील नाले व गटारी बांधण्याबाबत बांधकाम अभियंता यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी आदेशीत केले. यावेळी न.पा.अधिकारी कर्मचारी, स्चव्छता विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.