⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | शासकीय गोदामातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आमदारांकडुन भांडाफोड

शासकीय गोदामातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आमदारांकडुन भांडाफोड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । सामान्यांना मिळणारे भरडधान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरीकांच्या आलेल्या तक्रारीवरुन आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुक्ताईनगर व कुऱ्हा येथील शासकीय गोदामात धाव घेऊन निकृष्ट दर्जाच्या धान्याची भांडाफोड केली. दोंन्ही गोदामात साठवुन असलेले धान्य काळे पडलेले व सडलेल्या अवस्थेत असल्याचे पाहणी दरम्यान दिसुन आले. नुकतेच डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांत खरेदी करण्यात आलेले धान्य या तिनच महिन्यात खराब झाले तरी कसे? सदरचे धान्य बदलवले तर नसेल ना? तसेच तहसीलदार यांच्याकडुन केल्या जाणाऱ्या तपासणीत ही बाब उघड कशी झाली नाही? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

तब्बल १ हजार ६०० क्विंटल ज्वारी व मका ९८६ क्विंटल मका असा सुमारे ७० लाख रुपयांच्या माल खराब झालेला आहे. सदर माल खरेदी करतेवेळी मालाची उत्कृष्ट प्रत पाहुनच खरेदी करण्यात येते.खरेदी करुन तिनच महिन्याच्या कालावधीत धान्य सडले असल्याने काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.किड व बुरशी लागलेले भरडधान्य जनावरे सुद्धा खाणार नाही.तिन महिन्यापुर्वी खरेदी केलेले धान्याला बुरशी कशी लागु शकते?सरकारला बदनाम करण्याचा तर हा प्रकार नाही ना? अशा संतप्त प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केल्या आहे. गोरगरीब सामान्य जनतेला पुरविले जाणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असुन हा प्रकार गंभीर आहे सरकारला बदनाम करण्याचा हा डाव खपवुन घेतला जाणिर नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.वरीष्ठ पातळीवरुन याबाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल. आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,नागरी व पुरवठा मंत्री आणि जिल्हाधिकारी यांचेकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

गोदाम परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे गैरफायदा घेत संबंधितांनी धान्याची अदला बदली केली असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी चौकशीदरम्यान नेमकं गौडबंगाल समोर येणार असुन तालुक्यातील जनतेचे या प्रकाराकडे लक्ष लागुन आहे.याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, मुकेश वानखेडे,छोटु भोई,अफसरखान,गणेश टोंगे, रितेश सोनार,प्रविण चौधरी,प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

यासंदर्भात तात्काळ चौकशी करण्या येईल व तसा प्रकार आढळुन आल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – श्वेता संचेती, तहसीलदार मुक्ताईनगर

author avatar
टीम जळगाव लाईव्ह