मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजूमामा भोळेंच्या हस्ते २५० कामगारांना रुमाल वाटप

मे 16, 2026 9:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढत्या उष्णतेचा त्रास कमी व्हावा आणि कामगारांना उन्हापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने भाजपा व्यापारी आघाडीतर्फे सुमारे २५० पुरुष व महिला कामगारांना रुमालांचे वाटप करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते हे वितरण संपन्न झाले.

New Project 1

यावेळी महानगरपालिका स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक राठी, भाजपा व्यापारी आघाडीचे विनय बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच हमाल कामगार अध्यक्ष इंद्रराज सपकाळे, कॉमेश सपकाळे, शरद मामा चौधरी, नगरसेवक विरण खडके, विजय वानखेडे, विनोद मराठे, मिलिंद चौधरी, प्रकाश डोडिया, विष्णुकांत मणियार, दीपक महाजन, सुनील तापडिया, मांगीलाल जैन, मुकेश कुकरेजा, कीर्तन सेजपारा, अभिलाष राठी, दर्पण पाटील, यश राठी, संजय शहा, रवींद्र फालक, प्रकाश बिर्ला, महेश पुरोहित, योगेश धूत, किरण कुलकर्णी, आकाश मंडोरा, सतनाम बावरी, संदीप दहाड, मयूर जाखेटे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now