बेपत्ता वृद्धाचा तापी नदीत आढळला मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या वयोवृध्दाचा तापी नदीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रूपचंद शहादू कोळी (तावडे) (वय ६८) रा. निमगाव ता. यावल असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे. रूपचंद कोळी हे निमगाव येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शुक्रवार दि. १० जून रोजी बाहेर जावून येतो असे सांगून बेपत्ता झाले होते, सोमवारी दि. १३ जून रोजी सकाळी १० वाजता यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथील तापी नदीच्या पत्रात कुजलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात यावल पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला होता. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेले रूपचंद कोळी यांचाच मृतदेह आल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.