अल्पसंख्याक आघाडी प्रत्येक प्रभागात राबविणार शिवसंपर्क अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियान अंतर्गत शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीची नियोजनाची बैठक रविवार घेण्यात आली. शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शिव संपर्क अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले. प्रसंगी महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेनेचे जेष्ठ नेते नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, अल्पसंख्यांक महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी शिव संपर्क अभियानाची माहिती दिली व पुढील शिव संपर्क अभियानासाठी सूचना देऊन शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी उप महानगरप्रमुख वसीम खान, इक्बाल शेख, रईस शेख, अल्पसंख्यांक शिवसैनिक विकी शेख, इक्बाल शेख, फिरोज शेख, अशपाक मिर्झा, जब्बार शेख, समीर खाटीक, अशपाक शाह, अशपाक बागवान आदी उपस्थित होते.