५०० रुपयाने भाड्याची खोली घेतली, अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिथे नेलं अन्..; चाळीसगाव हादरले

ऑगस्ट 1, 2023 4:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होता होत नसून अशातच चाळीसगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीला धमकी देत भाड्याच्या खोलीत नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजेच नराधम मुलगा अल्पवयीन आहे. दरम्यान, भाड्याने खोली देणाऱ्या दोन महिलांसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 3 1 jpg webp

नेमकी घटना काय?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून तिच्याच गावात राहणारा अल्पवयीन मुलाने पिडीत मुलीला आत्महत्या आणि घरच्या लोकांना फसवण्याची धमकी देवून तिला चाळीसगाव शहरातील एका भागात नेवून ५०० रूपये घेवून भाड्याच्या खोली नेते. तिथे त्याने पिडीत मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार त्याने तीन वेळा केला.दरम्यान, हा प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी विधी संघर्षीत बालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर भाड्याने खोली देणाऱ्या दोन महिलांना देखील पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर विधीसंघर्षीत बालकाला बाल न्याय मंडळात रवाना केले तर अटकेतील महिलांना न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now