नशिराबादमध्ये घरातच सुरू होती गोवंशाची अवैध कत्तल; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

सप्टेंबर 9, 2026 6:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या ‘पोळा’ सणाच्या अगदी एक दिवस आधी जळगावच्या नशिराबाद शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कुरेशी मोहल्ल्यात घरातच गोवंशाची अवैध कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोन संशयितांना नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून गोवंशाचे मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.या कारवाईने परिसरात खळबळ उडाली

crime 2 jpg webp

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कुरेशी मोहल्ल्यातील एका घरात गोवंशाची कत्तल करून मांसाची विल्हेवाट व विक्री केली जात होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी पहाटे सुमारे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास संबंधित घरावर अचानक छापा टाकला.या कारवाईदरम्यान अकिल शेख आयुब कुरेशी (वय ३२) आणि असलम शेख आयुब पिंजारी (वय ३०, दोघे रा. कुरेशी मोहल्ला, नशिराबाद) हे दोघे घरात गोवंशाची अवैध कत्तल करून विक्रीच्या उद्देशाने मांस बाळगताना रंगेहात सापडले. पोलिसांनी घटनास्थळावरून मांस व इतर साहित्य जप्त केले आहे.या धडक कारवाईनंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल लक्ष्मण महाजन (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा बंदोबस्त तैनात, परिस्थिती नियंत्रणात
सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरनारे करीत आहेत. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती त्वरित नियंत्रणात आली असून परिसरात सध्या शांतता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now