महसूल प्रकरणांचा जलद निपटारा होणार! जळगावात महसूल लोक अदालत अभियान सुरू

सप्टेंबर 11, 2026 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महसूल व वन विभागाच्या दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्देशानुसार दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव तसेच नगर भूमापन अधिकारी व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या स्तरावरील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांच्या अपिलांचा समावेश करण्यात येणार आहे.

court

अभियानांतर्गत प्रथम महसूल लोक अदालत दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी, तर द्वितीय महसूल लोक अदालत दि. ६ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी यांनी त्यांच्या विभाग स्तरावर महसूल लोक अदालतीचे आयोजन करावे.

ज्या अर्धन्यायिक न्यायालयात अथवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित असेल, तेथे दोन्ही पक्षकारांनी किंवा त्यांच्या वकिलामार्फत सोबत जोडलेल्या ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जाची छाननी करून दोन्ही पक्षांच्या संमतीची खात्री केली जाईल व त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा प्राप्त करून घेण्यात यावा.

निश्चित केलेल्या लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यावर अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावे. उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात घेण्यात आलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ बाबतचा त्रैमासिक अहवाल सोबतच्या ‘प्रपत्र-ब’ मध्ये दुसऱ्या दिवशी सादर करावा.

या अभियानाबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच या अभियानाची जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि फलकाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now