अरे वा ! म्हाडाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे जळगावात स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

जुलै 6, 2025 6:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । जर तुमचेही जळगावमध्ये घर घेण्याचं स्वप्न असेल आणि महागड्या किमतीमळे ते घेऊ शकले नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच जळगावमधील ममुराबाद रस्त्यावर लवकरच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत एक महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी हा सात मजली प्रकल्प तयार होणार असून या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे जळगावमधील अनेक गरीब व गरजू कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. विशेष शासनाकडून घरासाठी अनुदान देखील मिळणार आहे.

mhada

महापालिकेकडे सादर केलेल्या या योजनेत १४४ फ्लॅट्स आणि २५ दुकाने असतील. शासनाच्या गट क्र. ४२० / ४२१ मधील ३,१०० चौरस मीटर जमिनीवर प्रकल्प उभारला जाणार आहे. ११ जून रोजी, अग्निशमन विभागाने प्रकल्पाला मंजुरी दिली असून, पुढील प्रक्रिया नगररचना विभागाच्या सहायक संचालकांच्या तपासणीनंतर अंतिम मंजुरी देण्यात येईल.

गाडगेबाबा चौकात ४०० घरांचा गृहप्रकल्प
पंतप्रधान निवास योजनेंतर्गत महाबळ परिसरातील गाडगेबाबा चौकात ४०० घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेली ६० हजार चौरस फूट जागा महापालिकेच्या नावावर आहे. सात मजली इमारतीत एक आणि दोन बीएचकेचे फ्लॅट असतील. कर्जाचीही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

शासनाकडून मिळणार घरासाठी अडीच लाख
घरांसाठी शासनाकडून दीड लाख तर केंद्राकडून एक लाख असे अडीच लाख रुपये अनुदान मिळणार असल्यामुळे शहरातील बेघर असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध होणार आहे. ज्यांनी महापालिकेत नोंदणी केली आहे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

ममुराबाद रस्त्यावर हा म्हाडाचा तिसरा गृहप्रकल्प असेल. म्हाडा अंतर्गत दोन इमारती उभारणार आहे. एक सहा मजली आणि दुसरी सात मजली. हा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुषंगाने राबवण्यात येत असून, गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देणे, हा मुख्य हेतू आहे. याआधी एसएमआयटी महाविद्यालयाजवळील रेल्वे गेटजवळ आणि दुसरा एमआयडीसी भागात होता. बऱ्याच वर्षांनंतर म्हाडाने जळगावात पुन्हा गृहप्रकल्प हातात घेतला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now