जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। दि. 19 ऑगस्ट 2023 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता गुरुवर्य प .वि.पाटील विद्यालयातील सेमिनारहॉल मध्ये खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका* तर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये उत्तीर्ण 10वी,12वी,पदवी, पदविका प्राप्त जळगांव तालुक्यातील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पाल्यांचा गुणगौरव सभारंभ 2023 चे आयोजन करण्यात आले
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुक्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने कारण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे जळगाव तालुका अध्यक्ष निलेश मोरे यांनी मांडले.कार्यक्रमास शिक्षणाधिकारी प्राथमिक जळगांव श्री विकास पाटील तसेच कार्यक्रमास अनमोल सहकार्य करणारे श्री.विवेक चौधरी(संचालक छाबडा एजन्सी,जळगांव) व श्री. एल.पी.चौधरी सर मुख्यध्यापक सौ. धनश्री फालक गुरुवर्य प.वि. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महासंघाचे राज्य सदस्य श्री टी के पाटील ,राज्य मुख्याध्यापक प्रतिनिधी हेमंत पाटिल, शिक्षकेतर राज्य प्रतिनिधी देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन, कार्याध्यक्ष राकेश पाटिल व बहुसंख्येने जिल्हा कार्यकारणीचे सदस्य कैलास तायडे,गोविंदा लोखंडे,गणेश लोडते , शाम ठाकरे ,प्रफुल्ल सरोदे,काझी सर,सुषमा साळुंके आणि तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तालुका सचिव राहुल चौधरी व उपाध्यक्षा प्रतीक्षा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या गुणगौरव सोहळ्यात एकूण 61 विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
तालुका उपाध्यक्ष केतन बऱ्हाटे,सोमनाथ लोखंडे,झाकीर अली,कैलास थोरवे,विनोद शेलवडकर,सागर झांबरे,निखिल जोगी,जाकिर सय्यद,जुबेर अहमद ,सागर पाटील,कल्पना सोनवणे,सुषमा गायकवाड,हर्षाली पाटील,सुनील नारखेडे,प्रमोद झलवार यांनी कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे आभार निखिल जोगी यांनी मानले.