राष्ट्रवादीतर्फे सदस्यता नोंदणी अभियान

फेब्रुवारी 18, 2022 8:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन २५ रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या शुभहस्ते फित कापुन सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला .

ncp 4 jpg webp

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) भैय्या रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, महिला आघाडीच्या महानराध्यक्षा मंगलाताई पाटील, विनोद देशमुख, योगेश देसले, वाल्मिक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, दुर्गेश पाटील, मजहर पठाण, अकील पटेल, ॲड. कुणाल पवार, रहीम तडवी, अशोक सोनवणे, आशा अंभोरे, जीतू बागरे, संजय हरणे, संजय जाधव, मूविकोराज कोल्हे व राहुल टोके उपस्थितीत होते.

आयोजन जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोटे नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुशील शिंदे, सूर्यकांत भामरे, दिप पाटील, कुणाल ठाकूर, शुभम हिरे यांनी केले. या सदस्यता नोंदणी अभियानात खोटे नगर परिसरातील 193 नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असुन सदस्यता नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now