सर्वसामान्यांसाठी खूशखबर! देशात ही औषध होतील स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे पॅरासिटामॉल सारख्या इतर औषधांच्या किमतीत कपात होणार आहे. भारतात राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरण देशातील औषधांची किंमत नियंत्रीत ठेवते. किंमती ठरवते. या प्राधिकरणाने आतापर्यंत 127 औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. किंमत कमी झालेली औषधं जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात औषधी दुकानांवर पोहचतील.

औषधांच्या किंमती घसरल्याचा मोठा फायदा सर्वसामान्य नागरिक, रुग्णांना लगेच होणार आहे. वृत्तानुसार, पॅरासिटामोलची किंमत अर्ध्यावर येऊ शकते. एमोक्सिसिलिन आणि पोटेशियम क्लेवनेट काम्बो (Amoxycillin and Potassium clavulanate ) या प्रतिजैविके (Antibiotic) तयार करणारी औषधी आहेत. या औषधांच्या एका गोळीची किंमत 6 रुपयांनी कमी होऊ शकते.

इतर औषधांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये अँटीबायोटिक मॉक्सीफ्लोक्सीन Moxifloxacin 400 MG या गोळीचा समावेश आहे. या गोळीची किंमत सध्या 31 रुपये आहे, ती लवकरच 21 रुपये होऊ शकते.

या संस्था अभ्यास करुन याविषयीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करतील. सध्या औषधांच्या दरांवर केंद्र सरकारचे थेट कोणतेही नियंत्रण नाही. औषधी निर्मिती कंपन्या एका वर्षात भावात केवळ 10 टक्क्यांची वाढ करु शकतात, हाच एक नियम आहे. सध्या केंद्र सरकार केवळ 886 फॉर्मूलेशन्सने तयार होणाऱ्या 1817 औषधांच्या भावावर अंकुश ठेऊ शकत आहे. देशात सध्या 20 हजार औषधी निर्मिती कंपन्या कार्यरत आहेत. तर काही औषधांवर या कंपन्या 200 ते 1 हजार पट नफा कमावितात.