⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नियतकालिक स्पर्धेत पारोळा येथील मयूरी पाटील द्वितीय

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित अंतर महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान विभागाची विद्यार्थिनी मयूरी कैलास पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महाविद्यालयाचे नियतकालिक ‘वसंत बहार’मध्ये मराठी विभागात भारतीय संविधानाचे महत्व या विषयावर मयूरीचा वैचारिक लेख प्रसिद्ध झाला हाेता. या लेखाचे विद्यापीठातर्फे परीक्षण झाले असून मयूरी द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. या यशाबद्दल ८ एप्रिलला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या हस्ते मयूरीचा सत्कार करण्यात आला.

यांची उपस्थिती

या प्रसंगी संस्थेचे संचालक तथा नगरसेवक रोहन मोरे, प्राचार्य डॉ. डि. आर. पाटील, प्रा. व्हि. एन. कोळी, विजय पाटील, नियतकालिकाचे संपादक प्रा. जे. बी. पाटील उपस्थित होते. मयूरीच्या यशाबद्दल संचालक, संपादक मंडळातील सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.