जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । जळगावच्या सुशिक्षित महापौर जयश्री सुनील महाजन यांनी नुकतेच जळगाव शहराचे लोकप्रिय आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्यावर विकास निधी आणल्यासंदर्भात बिन बुडाचे आरोप केलेले आहे. या बिन बुडाचे आरोपाचे खंडन भाजपा जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी पत्राद्वारे केले आहेत.

यावेळी ते म्हणले कि, जळगाव महानगरपालिकाचे महपौर जयश्री सुनील महाजन या सुशिक्षित असून त्यांना माहीत असावे कि, आ.राजूमामा भोळे यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी २०१४ ते २०२२ पर्यंत अनेक कोटी रुपयांचे कामे केले आहेत. सर्वप्रथम यामध्ये आपली मनपामध्ये सत्ता असताना जे.डी.सी.सी बँक हुडकोचे कर्ज कोणी फेडले? छ.शिवाजीनगर व पिंप्राळा उड्डाण पुलासाठी निधी कोणी दिला? शहरातल्या मेहरूण तलाव विकास व सुशोभीकरणासाठी ५ कोटीचा निधी कुठून आला? याचे उत्तर महापौरांनी देणे अपेक्षित आहे.

युती सरकारच्या काळात १०० कोटी रुपये निधी मंजूर करून शहरात ४२ कोटीचे कामे सुरु होणार आहेत हे आपल्याला माहित असावे. तसेच जळगाव शहराच्या रस्त्यासाठी ५ कोटी निधी नुकताच मंजूर केला. याचीही आपण नोंद घ्यावी तसेच महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव शहराच्या विकास आराखड्यासाठी १०० कोटीचा निधीची मागणी नुकतिच आ सुरेश भोळे यांनी केली.असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.
शेवटी दीपक सूर्यवंशी म्हणाले कि, राजूमामा भोळे हे कोणत्याही पक्ष व जातीपातीचे राजकारण करत नसून त्यांचा हेतू फक्त हा जळगाव शहराचा विकास हाच आहे. आ. भोळे यांनी सर्व पक्षाच्या लोकांना निधी दिला. शहराचा विकास हेच सबका साथ, सबका विकास हे भारतीय जनता पक्षाचे ब्रीद वाक्य आहे. जयश्रीताई महाजन या सत्ताधारी महापौर आहेत. त्यांनी मनपा मध्ये आ. राजूमामा भोळे यांनी शहराच्या विकासासाठी किती निधी आणला याचा सखोल अभ्यास करावा. सुशिक्षित असून अज्ञाणी व्यक्तीसारखे बिन बुडाचे आरोप केलेले आहेत












