जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्या दि.१८ मार्च रोजीची महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाईन पद्धतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिकेत ऑफलाईन बैठक घेवून महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्यात आली होती. त्याच पध्दतीने जळगाव महानगरपालिकेची निवडणूक ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी अशी मागणीची याचिका डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. आज बुधवारी न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली. यावेळी मात्र खंडपीठाने महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे म्हंटले आहे.











