⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

माऊलींच्या हस्ते लक्ष्मीपूजनला ‘माऊली’चा खाद्य दरबार सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । उच्चपदस्थ शिक्षण घेऊनही आपल्या मातीत काही तरी करण्याचा ध्यास घेऊन व्यवसायिकभिमुख दृष्ट्या विचार करीत जिल्ह्यातील निलेश चव्हाण या तरुणाने एरंडाेल येथे आपल्या व्यवसायाचे यशस्वी पाऊल राेवले आहे. जळगाव शहरातील रहिवासी असलेले निलेश चव्हाण यांनी एरंडाेल येथे हाॅटेल माउली ची सुरवात नुकतीच केली असून याचा उदघाटन साेहळा नुकताच दणक्यात पार पडला. 

निलेश चव्हाण हे स्वत: उच्चशिक्षित आहे. हाॅटेल क्षेत्रात त्यांची ही दुसरी झेप असून आधी एरंडाेल येथेच त्यांचे ए१ नावाचे हाॅटेल आहे. याचे उदघाटन एरंडाेल येथील तहसिलदार सुचेता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा रसिक एज्युकेशन साेसायटीच्या उज्वला बाहेती, कासाेदा पाेलीस स्टेशनच्या एपीअाय निता कायटे, पंचायत समिती सभापती रेखा पाटील, नगरसेविका सरलाबाई पाटील, गुडशेफर्ड स्कुलच्या उप प्राचार्य नाजनिन शेख, समाजसेविका मालती लाेहार यांच्या हस्ते  करण्यात आले. तर प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, क्रीडा रसिक एज्युकेशन साेसायटीचे सचिव राेहन बाहेती तसेच बाहेती महाविद्यालय जळगाव चे प्राचार्य अनिल लाेहार, एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, विद्याप्रसारक मंडळ जळगाव चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, एरंडोल चे नगरसेवक मनोज पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, चांदवड चे सरपंच सचिन पवार, जेडीसीसी चे मंगलसिंग सोनवणे, नितीन बरडे, संजयसिंग परदेशी, डॉ सुरेश पाटील, आनंद दाभाडे, संजय बिर्ला आदी उपस्थित हाेते. 

एरंडाेल येथील दादाश्री पेट्राेल पंपाजवळ हाॅटेल माउलीची सुरवात करण्यात आली आहे. निखील यांचे कुटूंबात सर्व उच्चशिक्षित असून वडील अनिल लाेहार हे देखील ऍड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाचे गेले अनेक वर्षापासून प्राचार्य या पदावर आहे. मात्र पुणे येथील माेठ्या पगाराची नाेकरी साेडून आपल्या गावात काहीतरी करण्याची धडपड निखील यांची हाेती. यासाठीच त्यांनी आपल्या गावी स्थायिक हाेण्याचा विचार केला परीणामी गेल्या वर्षी हाॅटेल ए१ ची स्थापना केल्यानंतर याच क्षेत्रात यशस्वी पाऊल म्हणून हाॅटेल माऊलीची आता सुरवात केली. तर याठीकाणी फन अँड फुड ची संकल्पना राबविण्यात आली आहे. कुटूंबासह याठीकाणी आल्यानंतर लहान मुलांना देखील खेळण्याचा आनंद मिळावा तर ग्रामीण भागातील नागरीकांना देखील या सर्व सुविधा मिळायला हव्यात या दृष्टीने हाॅटेल माऊलीची सुरवात करण्यात आली असल्याचे यावेळी निखील चव्हाण यांनी सांगितले. दिवाळीच्या खास मुहूर्तावर नागरीकांच्या सेवेत हाॅटेल सुरु करण्यात आले आहे. यासाठी कविता चव्हाण यांचे सहकार्य मिळाले.