सावदा येथे स्वामींनारायण गुरुकुलमध्ये मारुती यज्ञ संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । कोरोना समूळ उच्चाटन व्हावे व नागरिकांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आपले संपूर्ण प्रयत्न करीत आहे, तर धार्मिक कार्याव्दारे देखील नागरिकांना स्वास्थ लाभावे यासाठी येथील औद्योगिक वसाहती जवळील श्री.स्वामीनारायण गुरुकुल मध्ये दोन दिवसीय मारुती यज्ञ संपन्न झाला.

सध्या सुरू असलेल्या या कोरोना काळात सर्वच जण त्याचे उच्चाटना साठी प्रयत्न करीत असताना यात त्यांना यश मिळावे व कोरोना संकट दूर व्हावे यासाठी महावीर कष्टभंजन देव हनुमानजी महाराज यांचे जयंतीदिनाचे औचित्य साधून दि 26 व 27 रोजी हा मारुती यज्ञ येथे धार्मिक वातावरणात तसेच फक्त पूजापाठ सांगणारे ब्राम्हण व गुरुकुल मधील साधू संतांचे उपस्थितीत कोरोना बाबतीतचे सर्व नियम पाळून पार पडला.

या यज्ञास जळगाव येथील प्रसिध्द पुरोहित श्रीकांतजी रत्नपारखी याचे उपस्थितीत शास्त्रोक्त मंत्रविधी व पूजापाठ करण्यात आले यावेळी गुरुकुलचे उपाध्यक्ष भक्तीकिशोरदासजी, तसेच शास्त्री भक्तीस्वरूपदासजी,  शास्त्री लक्ष्मीनारायणदासजी, शास्त्री विश्वप्रकाशदासजी, शास्त्री सत्यप्रकाशदासजी, पार्षद दिपक भगत, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या यज्ञाचे यजमान सुनील देवराम चौधरी, रा, न्हावी, व जितेंद्र मिठाराम चौधरी रा, पिळोदा हे होते यावेळी पुरोहित, मुख्ययजमान, व शास्त्रीजी यांचे शिवाय येथे कोणालाच प्रवेश नव्हता, शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करीत हा यज्ञ सर्वांचे आरोग्यासाठी व कोरोना निवारणा साठी संपन्न झाला.