जळगाव जिल्हा

नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचे बार! गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल ‘एवढे’ महूर्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । तुलसी विवाह होताच इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरुवात होते. यंदा नोव्हेंबरपासून लग्नाचे बार उडणार असून नोव्हेंबरच्या तुळशी विवाहापासून तब्बल ६६ विवाह मुहूर्त आहेत. ते गतवर्षीपेक्षा अधिक महूर्त यंदा आहेत. हिंदू पंचांगानुसार, २०२३ मध्ये लग्नासाठी तब्बल ६४ शुभमुहूर्त होते. त्यापैकी अद्याप नोव्हेंबर महिन्यासह डिसेंबर महिन्यात लग्नाचे मुहूर्त बाकी असल्यामुळे लग्नांची धामधूम दिसणार आहे.

दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला की लग्नांची धामधूम सुरु होते. नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त सुरू होत आहेत. ते मुहूर्त पुढील वर्षीच्या जुलैपर्यंत आहेत. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत विवाहासाठी तब्बल ६६ मुहूर्त आहेत. त्यात नोव्हेंबर महिन्यात तीन मुहूर्त असून यात २७, २८, २९ या तारखेला मुहूर्त आहे.

यंदा ८ मुहूर्त जास्त
हिवाळ्यात तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नाचा धूमधडाका सुरु होतो. यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच लग्नाचे मुहूर्त सुरु होत आहेत. गतवर्षी ५८ विवाह मुहूर्त होते. देवशयनीनंतर यंदा नवीन विवाहमुहूतांना प्रारंभ होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८ मुहूर्त अधिक आहेत.

४४ गोरज मुहूर्त
गोरज मुहूर्त हा सायंकाळी सूर्यास्ताच्या आसपास असतो. पाणी कमी असलेल्या भागात, तसेच अन्य काही व्यावसायिक समुदायांमध्ये गोरज मुहूर्तावरच विवाह करण्यास अनेकांची पसंती असते. त्यामुळे सायंकाळचा सोयीस्कर विवाह मुहूर्त निवडण्याचीही प्रथा आहे. यंदा १७, २४, २५, २२, २९ अशा प्रकारचे एकूण ४४ गोरज मुहूर्त आहेत

यावेळी अधिक मास असल्याने ५ महिने देवशयन राहणार आहे. त्यामुळे २९ जूननंतर थेट २३ नोव्हेंबरपासूनच विवाह आणि शुभकार्ये सुरु होतील. देवशयनपर्यंत ५२ मुहूर्त होऊन गेले आहेत. त्यानंतर जवळपास ५ महिन्यांनंतर २३ नोव्हेंबरपासून लग्नाचा दुसरा सिझन सुरु होणार आहे. त्यामध्ये १५ डिसेंबरपर्यंत नोव्हेंबर महिन्यातील ५ डिसेंबर महिन्यातील ७ असे एकूण विवाहाचे १२ मुहूर्त यंदाच्या इंग्रजी वर्षअखेरपर्यंत आहेत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button