गिरीश महाजनांच्या कन्येचा आज शाही विवाह सोहळा, दिग्गजांची हजेरी, कोण आहेत जावई?

मार्च 20, 2022 1:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२२ । भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या द्वितीय कन्या ‘श्रेया’ हीचा विवाह सोहळा आज 20 मार्चला संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी या लग्न समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि रोषणाईने परिसर उजळून निघालाय. महाजन यांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री हजेरी लावणार आहेत.

Marriage ceremony of Girish Mahajans second daughter

राजकीय मंडळी नेहमीच राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात आणि इतर सार्वजनिक कामात आपल्याला व्यस्त दिसतात. मात्र, त्याही पलीकडे नेतेमंडळींना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. याचाच प्रत्यय महाजनांच्या लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने आला आहे. महाजन यांच्या लेकीच्या विवाह सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी राहील्याने विधानसभेचे कामकाज आटोपून भेटलेल्या वेळेत महाजनांनी आपल्या जामनेर येथील निवासस्थानी मुलीच्या लग्नाची तयारी करत असल्याचे पाहायला मिळाले. विवाह मंडपाची तयारी असेल, वरातीसाठी लागणारा घोडा असेल,अशा अनेक कामाच्या लगीनघाईत सध्या महाजन व्यस्त दिसत आहेत.

गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी तब्बल 14 एकरावर मंडप आणि शामियाना उभारला आहे. राज्यभरातील सुमारे एक लाख पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. त्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कऱ्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गुलाबराव पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, अमृता फडणवीस यांच्यासह अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे समजते. थोड्याच वेळात या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. हजारो वऱ्हाडी जामनेर येथील विवाह सोहळ्याच्या स्थळी पोहचले आहेत.

कोण आहेत जावई?
गिरीश महाजन यांचे होणारे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत. त्यांचा कुठल्याही राजकीय घराण्याशी कुठलाही संबंध नसून ते फूड इंडस्ट्रीचे मालक आहे. या भव्य शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी जामनेर येथील हिवरखेडा रोडवर चौदा एकरमध्ये भव्य शाही मंडप उभारण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्या कन्येच्या लग्नासाठी मंडप सजला आहे. हजारो लोकांच्या भोजन व्यवस्थेसह पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now