प्रवाशांनो लक्ष्य द्या ! दौंड-भुसावळसह अनेक रेल्वे गाड्या रद्द ; जाणून घ्या कारण?
जळगाव लाईव्ह न्युज | १४ जानेवारी २०२३ | एकीकडे धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे तांत्रिक कारणांमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत आहेत. यातच आता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोपरगाव ते कान्हेगाव या स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाशी संबंधित कामे केली जाणार आहेत. यामुळे निजामाबाद-पुणे, दौंड-भुसावळ या गाड्या १२ जानेवारीपासून पुढील काही दिवस रद्द करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरील काही काळा बदललेल्या मार्गाने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
या गाड्या रद्द
२४ जानेवारीपर्यंत दौंड-निजामुद्दीन गाडी रद्द राहणार आहे. निजामुद्दीन-पुणे ही गाडी २६ जानेवारीपर्यंत, तर १२ आणि १९ जानेवारीला दौंड-भुसावळ-दौंड मेमू गाडीही रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २१ ते २३ जानेवारी या कालावधीत कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि २३ ते १५ जानेवारी या कालावधीत गोंदिया-कोल्हापूर ही गाडीही रद्द करण्यात येणार आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल?
पुणे-अमरावती ही १८ जानेवारीला धावणारी गाडी, १९ जानेवारीला सुटणारी पुणे-नागपूर, अमरावती-पुणे, २० जानेवारीला पुणे-आजनी-पुणे नागपूर, २१ जानेवारीला पुणे-अजनी आणि २२ जानेवारीची अजनी-पुणे या सर्व गाड्या पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड या बदललेल्या मार्गाने धावतील. २२ जानेवारीला हावडा-पुणे, हटिया-पुणे या गाड्या नागपूर, बल्लारशाहा-काजीपेट, सिकंदराबद, दौंड, पुणे या मार्गाने धावतील. २३ जानेवारीला हजरत निजामुद्दीन-मैसूर एक्स्प्रेस पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे या मार्गाने धावेल.