राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी मनोज वाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते मनोज वाणी यांची राष्ट्रवादी अर्बन सेल शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.

देशात शहरीकरण झपाट्याने चालू असल्याचे बघायला मिळत असून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आपल्यापुढे उभी टाकले आहेत. शहराचा विकास नियोजित शास्रोक्त व योग्य पध्दतीने होण्याच्या दृष्टीने यापुढे पावले उचलण्याची गरज आहे. 

हे करीत असताना यामध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविणे अपेक्षित आहे. या सर्व प्रश्नांना संबोधित करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलची स्थापना केली. आपण या सेलच्या माध्यमातून वरील उद्देश यांना साध्य करण्यासाठी तसेच शहराच्या विकास कामांमध्ये हातभार लावण्यासाठी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याची जबाबदारी मनोज वाणी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते मनोज वाणी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष विनोद देशमुख, प्रदेश सरचिटणीस लिलाधर तायडे नामदेव चौधरी, मुविकोराज कोल्हे आदी उपस्थित होते.