जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील विधानसभा निवडणुकीतील आताच्या घडीची मोठी बातमी आहे.ती म्हणजेच मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे.
288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते 13- 14 जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
मनोज जरांगेंनी माघार का घेतली?
काल समाजबांधवाशी मतदारसंघावर सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन चार वाजेपर्यंत चर्चा झाली. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. एकाच जातीवर कसं लढणार, एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही. मराठा समाजाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.