.जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ, जयपूर.राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापी.
या संघातील खेळाडू व पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील टी वाय बी एस् सी चा विद्यार्थी खेळाडू मनीष ठाकुर यास मिनी गोल्फ स्पर्धेत डबल मिक्स प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक पराग मोरे, प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. मनिष ठाकुर यांना क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार मार्गदर्शन लाभले.