⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्हा दूध संघ निवडणूक : मुक्ताईनगर मतदार संघातील निकाल आला, कोण झाला विजयी?

जिल्हा दूध संघ निवडणूक : मुक्ताईनगर मतदार संघातील निकाल आला, कोण झाला विजयी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी चेअरमन मंदाकिनी खडसे या पराभूत झाल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध शेतकरी विकास पॅनलचे चाळीसगाव मतदार संघातील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण विजयी झाले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी 255 मतांनी विजयी मिळवत माजी चेअरमन मंदाताई खडसे यांच्या पराभव केला आहे. या निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांनी 179 मते मिळाली आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलेच तापले गेलं होते. यावरून आरोप-प्रत्यारोप होत होती. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघातून आ. एकनाथ खडसेच्या पत्नी व दुध संघाच्या चेअरमन सौ. मंदाताई खडसे व भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांच्यात लढत झाली. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.

या निवडणुकीत आ.चव्हाण यांनी २५५ मतांनी विजयी मिळवत माजी चेअरमन मंदाताई खडसे यांच्या पराभव केला आहे. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.