---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

जळगावातील भाजप आमदाराने काढली संजय राऊतांची लायकी ; काय म्हणाले वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अनेक पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांचा प्रचारही सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांमध्ये टोमणेबाजी सुरु आहे. अशातच चाळीसगावमधील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची लायकी काढत खोचक टीका केली आहे.

sanjay raut jpg webp

आमदार मंगेश चव्हाण यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतला कुत्रं विचारत नाही. संजय राऊत यांची लायकी काय आणि ते बोलतात काय? संजय राऊतमध्ये वेडसरपणा सदृश्य लक्षणं दिसत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ती लक्षणही वाढत आहेत. संजय राऊत यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक कॉट कायमस्वरूपी बुक करावा लागेल. अशी सध्या परिस्थिती आहे, असं चव्हाण म्हणाले.

---Advertisement---

तसेच मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरही टोला लगावला आहे. वरिष्ठांच्या निर्णयानंतर आणि एकनाथ खडसेंची पूर्णता वापसी झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित राहील. एकनाथ खडसे यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो सात वर्षांपूर्वीचा आहे. एखाद्या जुन्या फोटोला वेगळा संदर्भ देणं, याला काही अर्थ नाही. एकनाथ खडसे लोटांगण घालत असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील. जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसेंनी पक्षात पुन्हा यावं अशी मागणी नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---