जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेन दिवस वाढत आहे. आसोदा रोड मोहन टॉकीजवळ एका ३८ वर्षीय महिलेचा २५ हजार रूपयांची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शनीपेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी छाया रतन बाविस्कर (वय-३८) रा. मोहन टॉकीजवळ आसोदा रोड जळगाव ह्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गुरुवार २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास छाया बाविस्कर या महिला घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी अंदाजे ४० वर्षीय वयोगटातील अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. तुमच्या घरात दोष असल्याचे सांगून घराच्या अंगणात पुजेच्या ठिकाणी सोन्याची पोत व कानातले बाही ठेवले होते. महिला घरात चहापाणी करण्यासाठी गेल्या असता पुजेसाठी ठेवलेले मंगलपोत आणि सोन्याची बाही असा एकुण २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरून पसार झाला. महिलेने तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहे.

हे देखील वाचा :
- चाळीसगाव पोलिसांची अवैध गुटखा तस्करांवर मोठी कारवाई; लाखोंच्या मुद्देमालासह ५ जण गजाआड!
- मध्य प्रदेशचा सराईत दुचाकी चोरटा भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात! ६ दुचाक्या जप्त
- जळगावात घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त
- नवजात बालकाला नाल्यात फेकणाऱ्या मातेला ३ वर्षांची सक्तमजुरी; अमळनेर न्यायालयाचा मोठा निकाल!
- दुर्दैवी ! पुण्यातील कचरा डेपो दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू







